Amaravati Accident | चिखलदऱ्याच्या खोल दरीत कोसळलेल्या ६ पर्यटकांना बचाव पथकाकडून जीवदान

जिल्हा शोध व बचाव पथकाची कामगिरी : २ लहान मुलांसह ४ प्रौढांचा समावेश
Amaravati Accident
चिखलदऱ्याच्या दरीत कोसळलेल्‍या दोन लहान मुलांना वाचवण्यात यश आले. Pudhari Photo
Published on
Updated on

अमरावती : चिखलदर्‍याजवळील कोसळलेल्या पर्यटकांच्या गाडीतील ६ जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप वाचवले. या घटनेत २ लहान मुलांसह ४ प्रौढांचा समावेश आहे. जीवाची पर्वा न करता रेस्क्यू मोहीम राबवणार्‍या टीमच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्ह्यातील चिखलदरा येथे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सदर गर्दी व पर्यटकांच्या सुरक्षेकरिता जिल्हाधिकारी अमरावती यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन चिखलदरा येथे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात डी डी आर एफ पथक तैनात ठेवण्यात आले आहे. शनिवारी (दि.२६) चिखलदरा घाट रस्त्यामध्ये शहापूर येथून अर्धा किलोमीटर पुढे पर्यटकांचे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दरीतून खाली पडले होते.

Amaravati Accident
Amaravati Accident | एसटीची दुचाकीला जबर धडक, पत्नी ठार - पती जखमी

गाडीमध्ये एकूण सहा व्यक्तींचा समावेश होता. त्यामध्ये ४ व्यक्ती व २ मुलांचा समावेश होता. सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चिखलदरा व ठाणेदार चिखलदरा यांनी तत्काळ कार्यवाही सुरू केली. डी डी आर एफ अमरावती येथील टीमला माहिती देण्यात आली. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व व्यक्तींना दरीतून सुखरूप बाहेर काढले. जखमींना तात्काळ चिखलदरा पी एस सी मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले.जिल्हा शोध व बचाव पथकात देवानंद भुजाडे, विशाल निमकर, भूषण वैद्य, अर्जुन सुंदरडे, महेश मांदळे, सुरेश पालवे, सुरज ठाकूर, अजय आसोले यांचा समावेश होता.

Amaravati Accident
Amaravati Heavy Rain : मेळघाटात पावसामुळे हाहाकार, जलसाठ्यातही वाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news