Amravati Accident News : मेळघाटात खासगी बस दरीत कोसळली; १२ प्रवासी जखमी

राजदेव बाबा हाय पॉईंटजवळ अपघात
Bus accident in Melghat
मेळघाटात खासगी बस पोपटखेडच्या पुढे राजदेव बाबा फाट्यावर दरीत कोसळली. Pudhari News Network

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील मेळघाटात धारणीवरून आकोटकडे जाणारी खासगी बस पोपटखेडच्या पुढे राजदेव बाबा फाट्यावर दरीत कोसळली. हाय पॉईंट जवळ मंगळवारी (दि.२) हा अपघात झाला. अकोटवरून पुढे ही बस मध्यप्रदेशकडे जाणार होती.

Bus accident in Melghat
अमरावती : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी पैसे मागणारा तलाठी निलंबित

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

राजदेव बाबा फाट्याजवळ खासगी बस (एमपी ४८ पी ०१०३) च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट दरीत जाऊन कोसळली. या बसमध्ये जवळपास २५ ते ३० प्रवाशी होते. त्यापैकी १२ प्रवासी जखमी झाले आहेत. बस दरीत कोसळल्यानंतर बसने तीन पलट्या घेतल्या. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यासोबतच अकोटवरुन बचावपथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाले. या पथकाने प्रवाशांना दरीतून काढण्याचे काम केले. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bus accident in Melghat
अमरावती : अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या

जखमींची नावे अशी

या अपघातात सर्व लहान मुले सुरक्षित आहेत. तसेच इतरांना सुखरुप दरीतून काढण्यात आले आहे. जखमी झालेल्यांना टेम्ब्रूसोडा आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी प्रवाशांमध्ये निजामुद्दीन अब्दुल (वय ६४, रा. धारणी), सविनाबी (वय ५५, रा. भिकन गाव मध्यप्रदेश), काली तुळशीराम जावरकर (वय ३०), शानू जांभेकर (वय ३२), कालू जांभेकर ( वय ३२), रेणुका जावरकर (वय २९,रा.दहिंद्रा), अनिल कासदेकर (वय ३३,रा.कुसुमकोट) आदींचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news