अमरावती : अल्पवयीन मुलीची छेड काढत दिली ॲसिड फेकण्याची धमकी

file photo
file photo

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : तरुणाने अल्पवयीन तरुणीची छेड काढत तिच्‍या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्‍याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.८) घडली. या प्रकरणी शेंदुर्जना घाट पोलिसांनी नवनीत दिलीप राऊत (वय २१ रा.पुसला) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्‍पवयीन मुलगी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी लहान भावाला शाळेतून परत आणण्यासाठी गेली होती. या वेळी आरोपी नवनीत राऊत याने तिचा दुचाकीवरून पाठलाग केला. दुचाकी आडवी लावत तिची छेड काढत तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकेन, अशी धमकी त्‍याने दिली. भयभीत झालेल्‍या मुलीने हा प्रकार आईला सांगत पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी नवनीत राऊत विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी थोरात करत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news