अमरावती; पुढारी वृत्तसेवा : वलगावनजीक असलेल्या वझरखेड येथील एका शेतात अजगराने कोल्ह्याची शिकार केल्याची घटना घडली. स्थानिक शेतकऱ्यांना शेतात हा अजगर दिसताच त्यांनी सर्पमित्रांना पाचारण करून याबाबत माहिती दिली. सर्पमित्रांनी अजगराचे सुरक्षित रेस्क्यू करून त्याला वडाळी येथील वन विभागाच्या स्वाधीन केले.
वझरखेड येथील एका शेतात या अजगराने कोल्ह्याची शिकार केली होती. त्यांनतर एका झुडपात हा अजगर दडून बसला होता. स्थानिक शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी अजगरावर लक्ष ठेऊन सर्पमित्रांना पाचारण केले. सर्पमित्र पवन बघल्ले, मयूर वानखडे, गोविंद बघल्ले, देवानंद वानखडे, तेजस उके, सिद्धार्थ मेश्राम यांनी तातडीने घटनास्थळ गाठून अजगराचे रेस्क्यू करून त्याला वडाळी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केले.
हेही वाचलंत का ?