अमरावती : दरोड्याचा प्रयत्नात असणा-या चौघांना अटक, गद्रे चौक परिसरात पोलिसांची कारवाई

अमरावती : दरोड्याचा प्रयत्नात असणा-या चौघांना अटक, गद्रे चौक परिसरात पोलिसांची कारवाई
Published on: 
Updated on: 

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : दरोड्याचा प्रयत्नात असणा-या चार जणांना पोलिस आयुक्त यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री गद्रे चौक परिसरातून अटक केली. अल्ताफ खान रहमतुल्ला खान (२४, रा. जमील कॉलनी), शादिक खान शेर खान (२४, रा. गुलिस्ता नगर), सैय्यद सलमान सैय्यद शौकत (२०, रा. यास्मिन नगर), मोहम्मद साहिल मोहम्मद सलीम (१८, रा. इकबाल कॉलनी) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. या संशयीत आरोपींपैकी एकाने पलायन केले. पोलिसांनी संशयीतांकडून एमएच २७ सीजे ३००४ या क्रमांकाची दुचाकी, चाकू, पिस्तूल, नायलॉन दोरी, लोखंडी रॉड, तीन मोबाईल, विविध वाहनांच्या चाव्या व अन्य काही साहित्य जप्त केले आहे.

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पथकातील पीएसआय गजानन राजमलू, पोलिस हवालदार सुनील लासूरकर, विनय मोहोड, जहीर शेख, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, विनोद काटकर, सागर ठाकरे हे रविवारी रात्री पेट्रोलिंग करीत असताना, राजापेठ स्थित गद्रे चौकात त्यांना काही तरुण संशयीतरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांची चौकशी करून अंगझडती घेतली असता, ते दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेऊन संशयीत आरोपींजवळील साहित्य जप्त केले. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी संशयीतांविरुद्ध कलम ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news