अमरावती : लैंगिक अत्याचारानंतर ६० वर्षीय महिलेचा खून

अमरावती : लैंगिक अत्याचारानंतर ६० वर्षीय महिलेचा खून
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचारानंतर एका ६० वर्षीय वृध्द महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.२५) रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल जगन्नाथ नांदुरकर (वय ३२, रा पथ्रोट) याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

६० वर्षीय महिला ही गेल्या अनेक वर्षांपासून एकटीच राहत होती. ही महिला धुणी-भांडी व मजूरीचे काम करुन स्वत:चा उदरनिर्वाह करत होती. दरम्यान, विशालची नजर या महिलेवर पडली. त्याने शुक्रवारी सांयकाळी या महिलेला स्वत:च्या घरी येण्यास सांगितले. त्यामुळे ती महिला त्याच्या घरात गेली. त्यावेळी त्याने महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन, घरात कोणीही नसल्याची संधी साधून महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न सुरु केला, त्यामुळे महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे विशालने एका पांढऱ्या कापडाच्या मदतीने महिलेच्या गळ्याला फास लावला आणि गळा दाबून तिला ठार केले. याबाबतची तक्रार महिलेच्या नातेवाईकाने पोलिसांत दिली आहे.

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह विशालच्या घरात असल्याचे नागरिकांना समजले. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती पथ्रोट पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकारात अत्याचार तसेच खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पथ्रोट परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news