

अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे राहणाऱ्या एका मुलाने दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून त्याच्या आईस चाकू मारून जखमी केल्याची घटना 2 मे रोजी रात्री घडली.
या प्रकरणी मुलाविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, कल्पना बुद्धु भोसले (रा. शेलुबोंडे) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, तिचा मुलगा राकेश बुद्धु भोसले (22) हा 2 मे रोजी दारू पिवून घरी आल्यावर आईला शिवीगाळ करीत होता.
या वेळी त्याने दारू पिण्याकरिता आईकडे पैसे मागितले. आईने -पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने दारूच्या नशेत आईच्या पोटावर चाकू मारून तिला जखमी केले. राकेश बुद्धु भोसले याच्याविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .