कावड यात्रेच्या निमित्याने अकोला तालुक्यातील गांधीग्राम, पुर्णा नदी येथे शोध आणि बचाव पथके रविवारी (दि.1) सज्ज ठेवण्यात आली आहेत. श्रावण महिन्यातील पाचव्या सोमवारी अकोला शहराचे अराध्यदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदीरामध्ये जलाभिषेक करण्याचे अनुषंगाने मोठया प्रमाणात शिवभक्त गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर जल आणण्यासाठी जातात.
सदर शिवभक्ताच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने पुर्णा नदीवर जिल्हा प्रशासनाचे वतीने शोध व बचाव पथके रात्रभर सज्ज ठेवण्यात आले आहेत. पुर्णा नदीमध्ये दोन बोटीसह बचाव पथक सदस्य सज्ज राहतील. तहसीलदार अकोला यांचे मार्गदर्शनामध्ये सदर पथके पुर्णा नदी येथे उपस्थित आहेत. तसेच गांधीग्रमा येथे नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, मंडळ अधिकारी दत्त काळे, प्रशांत सायरे , तलाठी सचिन चिकार ,दिपक राउुत, सुनिल कल्ले , वंदे मातरम आपत्कालिन पथकाचे मनिष मेश्राम , राजकुमार जामनिक व पथक सदस्य , संत गाडगेबाबा आपत्कालिन पथकाचे दिपक सदाफळे व पथक सदस्य , मॉं चंडीका आपत्कालिन पथकाचे रणजित घोगरे व सदस्य उपस्थित आहेत.