

अकोला : काश्मीर येथील पहलगाम येथे दि. 22 एप्रिल रोजी झालेल्या अतिरेकी हल्याच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील 31 प्रवाशी अडकले होते, . 25/04/2025 रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे माध्यमातून सर्व 31 प्रवाशांना सुखरूपपणे विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले आहे, उद्या दुपारपर्यंत सर्व प्रवाशी स्वतःचे घरी पोहचतील अशी माहिती आहे.
अकोला जठारपेठ येथील गुरुमाऊली टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सने काश्मीर येथे यात्रा आयाजित केली होती. त्यानुसार अकोला, बुलढाणा व पुणे येथील 31 प्रवाशांना रेल्वेने घेऊन काश्मीर येथे पोहचले होते, सदर प्रवासी/ पर्यटक श्रीनगर मधील डल नेक जवळ असलेल्या हॉटेल मध्ये सर्व प्रवासी मुक्कामी होते, सर्व सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती अंबादास सप्रे समन्वयक गुरुमाऊली टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स यांचेमार्फत दुरध्वनीव्दारे प्राप्त झाली होती. या प्रवाशांना सुखरुपपणे आणन्याच्या अनुषंगाने राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष मुंबई यांना नावांच्या यादीसह माहिती जिल्हाधिकारी कार्यालया अकोला मार्फत देण्यात आली होती, तसेच याबाबत सदर प्रवाशांसी वेळोवेळी संपर्क करण्यात येत होता, आज दि. 25/04/2025 रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे माध्यमातून सर्व 31 प्रवाशांना सुखरूपपणे विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले आहे, उद्या दुपार पर्यंत सर्व प्रवाशी स्वतःचे घरी पोहचतील.