

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह आणखी एकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.१३) दुपारी शिवर गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली.
माजी आमदार तुकाराम बिडकर हे आपले मित्र राजदत्त मानकर यांच्यासह भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी शिवणी विमानतळावर गेले होते. त्यांची भेट घेऊन दुचाकीवरून परत मूर्तिजापूरला परत येत होते. यादरम्यान ते शिवर येथील राष्ट्रीय महामार्गावर आले असता पिकअपने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, तुकाराम बिडकर यांच्यासह दुचाकीवरील त्यांचे मित्र राजदत्त मानकर यांचा जागीच मृत्यू झाला.