Kumbhi river body recovered : कुंभी नदीत वाहून गेलेल्या व्यक्तिचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

जोरदार पावसामुळे कुंभी नदीला पूर आला होता. वेतवडे धरणाजवळून जनार्दन शिंदे हे वाहून गेले होते
Kumbhi river body recovered : कुंभी नदीत वाहून गेलेल्या व्यक्तिचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला
Published on
Updated on

Body of Man Swept Away in Kumbhi River Found After 4 Days of Search

कोल्हापूर : कुंभी नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या जनार्दन शिंदे यांचा मृतदेह आज (दि.१२) सकाळी तांदुळवाडी (ता. पन्हाळा) येथील नदीपात्रात आढळून आला. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कळे पोलीस प्रशासन आणि 'व्हाईट आर्मी'च्या जवानांकडून शिंदे यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवण्यात येत होती.

Kumbhi river body recovered : कुंभी नदीत वाहून गेलेल्या व्यक्तिचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला
Palghar news : सूर्या नदीत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर सापडला...

अशी होती घटना

जोरदार पावसामुळे कुंभी नदीला पूर आला होता. वेतवडे धरणाजवळून जनार्दन शिंदे हे वाहून गेले होते. पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्यामुळे शोध मोहिमेत वारंवार अडथळे येत होते. अखेर चौथ्या दिवशी ही मोहीम यशस्वी झाली असून, त्यांचा मृतदेह लोंघे (ता. गगनबावडा) हद्दीत तांदुळवाडी परिसरातील नदीपात्रात सापडला.

Kumbhi river body recovered : कुंभी नदीत वाहून गेलेल्या व्यक्तिचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला
Drowning incident: पनवेलजवळील नदीत पाण्याच्या प्रवाहात एक जण गेला वाहून, दुसऱ्याचा मृत्यू

शोध मोहिमेत सहभाग

व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भोसले, शैलेश रावण, श्रीकांत पाटील आणि शंकर केंगारे यांच्या पथकाने अथक प्रयत्न करून मृतदेह शोधून काढला. घटनास्थळी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि मृतदेहाचा पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news