माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या निधनाने मार्गदर्शक हरपला: पालकमंत्री आकाश फुंडकर

Tukaram Bidkar | कुंभारी येथे बिडकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Tukaram Bidkar death
कुंभारी येथे माजी आमदार तुकाराम बिडकर यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. Pudhari Photo
Published on
Updated on

अकोला, पुढारी वृत्तसेवा : विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या निधनामुळे एक लोकनेते व विदर्भातील सक्षम नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने आपण मार्गदर्शक गमावल्याची भावना राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली.

माजी आमदार दिवंगत बिडकर यांच्यावर आज कुंभारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री फुंडकर यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार अमर काळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, गुलाबराव गावंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

माजी आमदार दिवंगत बिरकड यांच्याशी आपले अनेक वर्षांपासून कौटुंबिक स्नेह व जिव्हाळ्याचे संबंध होते. दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी त्यांचे सख्य होते. मी मंत्री झाल्यानंतर त्यांनी आवर्जून भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्याशी नेहमी संवाद होत असे. अनेक विषयांत त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या रूपाने मार्गदर्शक हरपल्याची भावना पालकमंत्री फुंडकर यांनी व्यक्त केली.

Tukaram Bidkar death
Tukaram Bidkar | माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह त्यांच्या मित्राचा अपघाती मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news