

अकोला : पुढारी वृत्तसेवा: अकोला- पातूर राज्य महामार्गावरील हिंगणा फाटा येथे चार चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात (Akola Accident News) झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, चारचाकी वाहन रस्त्यावरील डिवाइडरला धडकून पलटी झाले.
मालवाहू वाहनासह वाहनातील वाहून येणाऱ्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने स्थानिक नागरिक प्रशांत अहीर यांनी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पातूर-अकोला राज्य महामार्गावरील हिंगणा फाटा येथे हा भीषण अपघात झाला. दरम्यान, दुचाकीस्वार मृत तरुणाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास जुने शहर पोलीस करत आहेत.