

ऑनलाईन पुढारी डेस्क : महानगरपालिका निवडणुकेचे निकाल जाहीर झाल्यानंतर आकोल्यामध्ये राजकीय तणावातून भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१६) रात्री घडली. नगरसेवकावर रुग्णालयात उपचार असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शरद तूरकर असे हल्ल्यात जखमी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकाचे नाव आहे.
आकोला महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक २ मधून निवडणूक लढवित भारतीय जनता पक्षाचे शरद तूरकर विजयी झाले. त्यानंतर तूरकर समर्थकांनी प्रभागातून त्यांची विजयी मिरवणूक काढली. यादरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर शरद तूरकर यांना तातडीने रुणालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. यादरम्यान वाहनांची तोडफोडही करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.