Akola News | ताडी विक्री दुकानांचा 'ई-लिलाव व निविदा' जाहीर; ई-टेंडरिंगद्वारे होणार प्रक्रिया

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांची माहिती
State Excise Department
State Excise DepartmentPudhari
Published on: 
Updated on: 

State Excise Akola

अकोला : अकोला जिल्ह्यातील सन २०२६-२७ या वर्षाकरिता ताडी विक्री दुकानांचा लिलाव हा  'ई-लिलाव नि निविदा' पद्धतीद्वारे आयोजित करण्यात आला आहे. शासन निर्णय आणि राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या आदेशानुसार ही लिलाव प्रक्रिया राबवली जात आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. 

ताडी दुकान लिलावाचा संपूर्ण जाहीरनामा www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून ०२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत जाहिरनामा संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच ई- ल‍िलावानुसार दि. २१ सप्टेंबर रोजी इच्छुकांनी वरील संकेतस्थळाचा वापर करुनच बोली लावावी.

State Excise Department
Akola News | वर्गखोलीचे छत कोसळले ; सुदैवाने दुर्घटना टळली

ई-लिलाव आणि निविदा पद्धत ही नवीन असल्याने बोलीधारकांना काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला यांच्या कार्यालयात थेट संपर्क साधावा. या ई लि लावाची माहिती इच्छुकांनी उपरोक्त नमूद संकेतस्थळावरुन प्राप्त करावी. या 'ई-लिलाव नि निविदा' प्रक्रियेचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news