Akola News | वर्गखोलीचे छत कोसळले ; सुदैवाने दुर्घटना टळली

पारद जिल्हा परिषद शाळेतील घटना
 ZP School
प्रातिनिधीक छायाचित्र
Published on
Updated on

अकोला - मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषद शाळेतील एका वर्गखोलीचे छत सोमवारी सकाळी अचानक कोसळले मात्र या वेळी विद्यार्थ्यांनी आपली दप्तरे वर्गात ठेवून मैदानात गेल्यामुळे सुदैवाने दुर्घटना टळली.

प्राप्त माहिती नुसार, या घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापक यांनी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी व शिक्षण प्रशासनाला तत्काळ कळविले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

सदर वर्गखोलीचे बांधकाम सन २००९-१० मध्ये करण्यात आले होते. विशेष म्हणजे शाळेतील हीच तुलनेने नवीन व पक्की वर्गखोली अलीकडच्याच काळात बांधकाम झाल्याची माहिती असून त्याच इमारतीच्या छताचा मलबा कोसळल्याने इतर जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेबाबत  प्रश्न उपस्थित होत आहेत. पारद येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण ६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेस चार नवीन वर्गखोल्या मंजूर होण्याची आवश्यकता असूनही त्याबाबत शासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news