गंभीर जखमी झालेल्या दिनेश बुब यांना तत्काळ अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास भगत, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शेळके,अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक डोगरे आदी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.