Akola Crime | १०५ पोलिसांची ५ पथके, ४ ड्रोन कॅमेरे; अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी जंगलात शोधमोहीम

दुर्गम जंगल परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे पोलिस दलाच्या कार्यक्षमतेची चर्चा
Forest Search Operation
Forest Search OperationAI Image
Published on
Updated on

Akola Police Sexual Assault Accused

अकोला : १० वर्षीय मुलीवर अत्याचार करून जंगलात फरार झालेल्या आरोपीला तब्बल दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या शोधासाठी १०५ पोलिसांची ५ पथके आणि ४ ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करण्यात आला. दुर्गम जंगल परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे पोलिस दलाच्या कार्यक्षमतेची चर्चा होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी फिर्यादी यांनी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. फिर्यादी व तिचे पती मजुरीसाठी बाहेर गेल्यानंतर घरी एकटी असलेल्या १० वर्षीय मुलीवर आरोपी जगराम गोविंदा आडे (६०, रा. सावरगाव ता. पातूर जि. अकोला) याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच ही घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Forest Search Operation
Akola News | अकोला जिल्ह्यात अनधिकृत सोनोग्राफी केंद्राची माहिती दिल्यास मिळणार बक्षीस

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अवित चांडक यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक शंकर शेलके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, चान्नी पोलीस स्टेशन, उपविभागीय पथके, आरसीपी आणि श्वान पथक अशा विविध यंत्रणा आरोपीच्या शोधासाठी कार्यरत करण्यात आल्या.

आरोपी जंगल परिसरात लपून बसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. आरोपीकडे मोबाईल किंवा वाहन नव्हते तसेच त्याचा कोणताही तांत्रिक मागोवा उपलब्ध नव्हता. सावरगाव परिसरातील २० ते २५ किलोमीटर घनदाट जंगलात पोलिसांनी पायी शोधमोहीम राबविली. या मोहिमेत चार ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात आला. दरम्यान, वन विभागानेही पोलिसांना मदत केली. अखेर ७ जुलै रोजी ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी जंगल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Forest Search Operation
Akola News : अकोला जिल्ह्यातील 3 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, 5 केंद्रांना नोटीसा; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

विशेष म्हणजे, आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आरोपी हा जंगलात पसार झाल्याचा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडे ही माहिती नव्हती का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरच संशय निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news