अकोला येथे औषधांचे दुकान फोडून ३ लाखांचा ऐवज लंपास

Akola News | चोरट्याला अटक, ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
Akola pharmacy burglary
अकोला येथे औषधांचे दुकान फोडून ३ लाखांचा ऐवज लंपास केला. Pudhari File Photo
Published on
Updated on

अकोला : पुढारी वृत्तसेवा : रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील तापडिया नगरजवळील मेड फोर यू मेडिकल स्टोअर्सच्या मागे असलेल्या ऑफिसचे शटर कापून मेडिकलमधील ३ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या घटनेची तक्रार मिलिंद ज्ञानेश्वर पांडव (वय ४३, रा. सद्‌गुरू पार्क अपार्टमेन्ट, जवाहर नगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपासामध्ये गुन्हे शोध पथकातील गोपनीय माहितीवरून रेकॉर्डवरील गजानन नरसिंग डावेराव (वय ६६, रा. पळसो बढे) यास अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथून ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडील ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आह़े.

Akola pharmacy burglary
अकोला : श्वान भुंकले...शेजाऱ्याने गाठला क्रूरतेचा कळस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news