अकोल्यामधील तापडिया नगरात रागातून श्वानाचे डोळे फोडल्याची घटना समोर आली आहे. घराशेजारील पाळीव श्वान वांरवार भुकत असतो, त्याच्या भुंकण्याचा त्रास होतो म्हणून श्वानाचे डोळे फोडून क्रूरपणे मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.८) तापडिया नगर येथे घडली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार, श्वान भुंकत असल्यामुळे त्याच्या भुंकण्याचा त्रास होत असल्याचा राग मनात ठेवून सोनू देशमुख याने आणखी तीन अनोळखी इसमासह श्वानाला पकडून त्याचे पाय बांधले आणि त्याच्यावर हॉकी स्टीक व काठ्यांनी अमानुशपणे मारहाण केली. या मारहाणीत श्वानाचे दोन्ही डोळे फोडले तसेच जबडा, पाय व पाठीच्या मणक्याला जबर दुखापत केली आहे. याप्रकरणी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसानी सोनू देशमुख याच्यासह तीन अनोळखी जणांवर गुन्हा दाखल केला आह़े
मारहाण करुन श्वानाला गंभीर जखमी केल्यानंतर त्याला निर्दयीपणे महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनात फेकून दिले होते. मात्र तक्रारकर्त्या महिलेने या वाहनाचा पाठलाग केला. वाहनाला थांबवून त्यातील जखमी श्वानाला बाहेर काढले. तातडीने श्वानाला स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथील वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.