अकोला: पुढारी वृत्तसेवा : अकोल्यातील मूर्तिजापुरात आज (दि.६) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेनंतर भाजप उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांची बुलडोझर वर चढून केलेली स्टंटबाजी चर्चेचा विषय ठरली.
पिंपळे यांनी बुलडोझर (जेसीबी) वर चढत उपस्थितीतांना आवाहन केले. तर पिंपळे यांना प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनीही दंड थोपटले. दरम्यान, आमदार आणि उमेदवार महोदयांची स्टंटबाजी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सध्या भाजप उमेदवार यांनी केलेली ही स्टंटबाजी राजकारणात रंगली आहे. दरम्यान पिंपळे यांच्या सोबत योगी सारखी वेशभूषा केलेला व्यक्ती पण होता.