अकोला जिल्ह्यातील ४३ जणांची उमेदवारी मागे , ७० उमेदवार निवडणूक रिंगणात

Maharashtra Assembly Polls |
Maharashtra Assembly Polls
file photo
Published on: 
Updated on: 

अकोला : जिल्ह्यातील 5 मतदार संघांत विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल वैध 113 अर्जांपैकी 43 व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली. आता 70 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.

उमेदवारी मागे घेतलेल्यांमध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून विशाल भगवान पाखरे, महेश भगवंतराव महल्ले, महेंद्र रमेश भोजने, बुद्धभूषण दशरथ गोपनारायण, सुभाषचंद्र वामनराव कोरपे, संजय वसंतराव वानखडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय बाबुलाल बडोणे, प्रकाश त्र्यंबकराव डवले, मिर्झा इम्रान बेग मिर्झा सलीम बेग, नंदकिशोर रामकृष्ण ढोरे, मदन बोदुलाल भरगड, जिशान अहमद हुसेन, नकीर खान अहमद खान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

बाळापुर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश मोतीराम डिवरे, अरविंद मोतीराम महल्ले, राजेश दादाराव देशमुख, शिवकुमार रतिपालसिंग बायस, शेख अहमद शेख शब्बीर, अमोल प्रमोद घायवट यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

अकोट विधानसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी रामकृष्ण लक्ष्मण ढिगर, यशपाल यशवंत चांदेकर, गजमफरखाँ मुजफ्फर खाँ, दिवाकर बळीराम गवई, देवेंद्र अशोकराव पायघन, सुभाष श्रीराम रौंदळे, डॉ. गजानन शेषराव महल्ले, सय्यद यावर अली सय्यद मुकद्दर अली यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले.

मुर्तिजापुर विधानसभा मतदारसंघातून भाऊराव सुखदेव तायडे, रवींद्र नामदेव पंडित, राजेश तुळशीराम खडे, संतोष देविदास इंगळे व अरुण सखाराम गवई, दयाराम बोंदरू घोडे, सिद्धार्थ ब्रह्मदेव डोंगरे, सचिन धनराज कोकणे, गोपाळराव कटाळे, पंकज ओंकार साबळे, राजकुमार नाचणे, विनोद सदाफळे या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले अशी माहिती आह़े.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news