Akola Lok Sabha : भाजपाने अकोला लोकसभेचा गड राखला! अनुप धोत्रे विजयी

Akola Lok Sabha : भाजपाने अकोला लोकसभेचा गड राखला! अनुप धोत्रे विजयी
Published on
Updated on

अकोला, पुढारी वृत्तसेवा : Akola Lok Sabha : अकोला लोकसभा मतदार संघाच्या चुरशीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी 40 हजाराहून अधिक मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा पराभव केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अँड. प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. लोकसभा मतदार संघाच्या 27 व्या फेरीनंतर अनुप धोत्रे यांनी 40 हजार 12 मत घेत विजय निश्चित केला.

पंधराव्या फेरीपर्यंत काँग्रेसचे अभय पाटील सातत्याने पुढे होते. मात्र त्यानंतरच्या मतमोजणीच्या फेरीमध्ये भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे सातत्याने मतांमध्ये पुढे राहिले. भाजपाचे अनुप धोत्रे यांना 4,53,866 तर काँग्रेसच्या अभय पाटलांना 4,13,854 आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांना 2,74823 एवढी मते प्राप्त झाली.

भाजपाने पुन्हा आपला गड राखला

अकोला मतदार संघातून गत चार लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे खासदार संजय धोत्रे हे सातत्याने विजयी झालेले आहेत. तर या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांनी बाजी मारत विरोधकांना पराभूत केले आहे. अकोला लोकसभा मतदार संघात या निवडणुकीत काँग्रेसने परिवर्तनावर जोर देत प्रचार केला होता. मात्र या मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या वतीने कौल दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news