Fruit Crop Insurance Scheme Extension
अकोला : जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे. चालू मृग बहारातील १४ जूनला सहभाग मुदत संपलेल्या लिंबू, संत्रा, पेरू या पिकांच्या शेतकरी सहभागासाठी 30 जून पर्यंत केंद्रशासनाने अंतिम मुदत वाढवलेली आहे.
शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळणेस्तव संत्रा, लिंबू,पेरू या फळपिकाकरिता दिनांक ३० जुन २०२५ तर डाळिंब करिता १४ जुलै २०२५ व मोसंबी करिता ३० जून २०२५ या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे.
अधिक माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी,उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन अजित कुंभार, जिल्हाधिकारी, अकोला व शंकर किरवे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला यांनी केले आहे.