Akola Farmers Protest | दुष्काळाच्या मागणीसाठी बार्शीटाकळीत तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

शेतकरी संघर्ष समिती बार्शीटाकळी तालुक्याच्या वतीने मोर्चा
Barshitakli Farmers Drought Demand Protest
शेतकरी संघर्ष समिती बार्शीटाकळी तालुक्याच्या वतीने बार्शीटाकळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला Pudhari
Published on: 
Updated on: 

Barshitakli Farmers Drought Demand Protest

अकोला : अनेक दिवसापासून पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी संघर्ष समिती बार्शीटाकळी तालुक्याच्या वतीने बार्शीटाकळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

त्यापूर्वीकृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात  शेतकऱ्यांची सभा पार पडली.त्यानंतर नगरपंचायत चौक, बायपास चौक या मुख्य रस्त्यावरून शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा शेतकरी हितांच्या घोषणा देत तहसील कार्यालयावर दाखल झाला.

Barshitakli Farmers Drought Demand Protest
Akola News | ताडी विक्री दुकानांचा 'ई-लिलाव व निविदा' जाहीर; ई-टेंडरिंगद्वारे होणार प्रक्रिया

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून, सरकारने बार्शीटाकळी तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून, शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांचेअनुदान व शेतमजुरांना दहा हजार रुपयांची मदत देऊन रोजगार हमीचे कामे चालू करावीत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी वपिक विमा देण्यात यावा, शेतकऱ्याला रब्बी हंगामात बी बियाणे तसेच खते विनामूल्य देण्यात यावे. पाणी व चारा टंचाईची समस्या तात्काळ सोडवून सिंचनासाठी आठ तास वीज उपलब्ध करून द्यावी. जमकेश्वर येथील तेहतीस केवी केंद्र तात्काळ चालू करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात मोठ्या संखेने शेतकरी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news