

Akot Illegal Fire Incident
अकोला : अकोट तालुक्यातील वारुळा येथील शेतकरी महेश रामभाऊ मोहोकार यांच्या ४ एकर शेतातील सोयाबीन ची गंजी अज्ञात व्यक्तीने रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान पेटवून दिल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, शेतातील सोयाबीन ची गंजी पेटवली असता त्या गंजी चा धूर व जाळ वारुळा परीसरात दिसत होता. त्यामुळे गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली असता पाण्याच्या अभावामुळे आग विझवू शकले नाही. पोलीस व अकोट येथील अग्निशमन दलाच्या साहाय्याने गंजी विजविण्यात आली.
घटनास्थळी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण चे पोलीस, कृषी अधिकारी, तलाठी यांनी जागेवर पंचनामा करून तसा अहवाल तहसीलदार अकोट यांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.