Akola News | महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा 'जनसंवाद', दुष्काळ निवारण्यासाठी तत्‍काळ उपाययोजना करण्याचे निर्देश!

शेतक-यांची निवेदने स्वीकारून जाणून घेतल्या व्यथा
Devsthan Inam land
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेpudhari photo
Published on: 
Updated on: 

अकोला  : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली व अकोला शासकीय विश्रामगृह, तसेच पारस येथील विश्रामगृह येथे उपस्थित राहून शेतकरी बांधवांची निवेदने स्वीकारली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दुष्काळ निवारणासाठी तत्काळ उपाययोजनेचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. 

यावेळी विविध भागांतून आलेल्या शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी आपल्या शेतीशी संबंधित अडचणी, प्रलंबित समस्या आणि मागण्यांबाबतची निवेदने महसूल मंत्र्यांकडे सुपूर्द केली. या प्रसंगी महसूल मंत्री बावनकुळे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या सविस्तर जाणून घेतल्या. सावकारी, पाणीटंचाई, कर्ज आणि इतर विविध विषयांवर शेतकऱ्यांनी आपले म्हणणे यावेळी मांडले.

सर्व निवेदनांद्वारे प्राप्त समस्या, अपेक्षा आणि अडचणींच्या निराकरणासाठी तत्काळ कार्यवाही केली जाईल. हे शासन शेतकऱ्यांचे असून, दुष्काळात सापडलेल्या शेतकरी बांधवांना संपूर्ण मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, महापौर शारदा खेडकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news