अकोला : लोणी टाकळीजवळ कार पुलावरून कोसळून ७ जण जखमी

कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
 Accident in Akola
अकोला : लोणी टाकळीजवळ कार पुलावरून कोसळून ७ जण जखमी झाले.Pudhari File Photo

अकोला, पुढारी वृत्तसेवा : मूर्तिजापूर तालुक्यातील लोणी टाकळी जवळील उड्डाणपुलाजवळ कार पुलावरून कोसळल्याने ७ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली.

 Accident in Akola
अकोला: जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती दर्गा परिसरातील शेख शैहबाज याच्या साखरपुड्यामध्ये जात असताना लोणी टाकळी जवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार (एमएच ३७ जी ४४७६) पुलावरून कोसळली. या अपघातात पाचजण जखमी तर दोन गंभीर जखमी झाले.

यामध्ये मूर्तिजापूर जुनी बस्ती परिसरातील जखमी अमरावती येथे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news