

Murtijapur Youth Death
अकोला: मूर्तिजापूर येथील एका शेतकरी पुत्राने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गुरूवारी (दि.४) उघडकीस आली आहे. दीपक कुलदीप येरडावकर (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे सततची नापिकी, नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळून मूर्तिजापूर शहरातील सोनोरी रोड वरील राहणाऱ्या कुलदीप शंकरराव येरडावकर यांच्या लहान मुलाने शेतात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली.
दीपक आपल्या वडिलांसोबत शेतीला हातभार लावत होता. मात्र, कर्त्याधर्त्या मुलाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने वडील कुलदीप खचून गेले आहेत. त्यांच्या कडे ८ एकर जमीन असून त्यांच्यावर बँक ऑफ इंडिया चे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्जाच्या डोंगरामुळे दीपक हाताश झाला होता. परिस्थितीत बदल होत नसल्याने त्याने अखेर आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.