अकाेला : पाेलीस भरतीचा सराव करणा-या युवतीचा मैदानावरच मृत्यू

अकाेला : पाेलीस भरतीचा सराव करणा-या युवतीचा मैदानावरच मृत्यू
Published on
Updated on

अकाेला, पुढारी वृत्तसेवा : पाेलीस भरतीच्या तयारीसाठी वसंत देसाई स्टेडीयमवर अनेक युवक, युवती सराव करत असतात. २४ ऑगस्ट राेजी असाच सराव करणा-या एका युवतीचा धावताना मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. रोशनी अनिल वानखडे (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची अकोला तालुक्यातील ग्राम धोतर्डी येथील रहिवासी आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राेशनी अकाेल्यात तिच्या बहिणीकडे शहरातील रणपिसे नगर भागात राहत होती. तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई, दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रोशनी पोलीस भरतीचा अभ्यास करीत असून शहरातील वसंत देसाई स्टेडियमवरील मैदानावर शारीरिक कसरत आणि धावण्याचा सराव करत होती. मात्र, आज (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास धावताना ती अचानक कोसळली आणि तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

नेहमीप्रमाणे रनिंग सुरु असताना तिला चक्कर येऊ लागली आणि रोशनी जागीच कोसळली. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून काहीच हालचाली झाल्या नाही. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, रोशनीच्या मृत्युमुळे मैदानावर धावणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार रोशनीला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. मागील वर्षी रायगडला पोलीस भरतीमध्ये रोशनीने प्रयत्न केला होता. मात्र, इथे तिला दोन गुणांनी अपयश आले होते. या घटनेची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news