अमरावती : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने वार; मोर्शी पोलिस ठाणे हद्दीतील घटना | पुढारी

अमरावती : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने वार; मोर्शी पोलिस ठाणे हद्दीतील घटना

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : ‘तु मला लाईक का करत नाही’, या कारणावरून एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिच्या हातावर लोखंडी शस्त्राने वार केले. ही धक्कादायक घटना मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या घटनेत पीडित मुलीच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी योगेश राजेश देशमुख (२५) याच्याविरुध्द विनयभंग, हल्ला करणे व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत कॉलेजमध्ये जात होती. दरम्यान आरोपी योगेश देशमुख हा तिचा पाठलाग करीत होता. त्याने मुलीला रस्त्यावर थांबवून ‘तु मला लाईक का करत नाहीस’, असे विचारले. याच कारणावरून योगेशने मुलीच्या उजव्या हातावर धारदार लोखंडी शस्त्राने वार केले. या घटनेत संबंधीत मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर योगेशने तीला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडित मुलीने मोर्शी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

हेही वाचा

Back to top button