नागपुरातील 'त्या' ओमायक्रॉन च्या पहिल्या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटीव्ह, रूग्णालयातून डिस्चार्ज | पुढारी

नागपुरातील 'त्या' ओमायक्रॉन च्या पहिल्या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटीव्ह, रूग्णालयातून डिस्चार्ज

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा

नागपुरात आढळलेल्या पहिल्या ओमायक्रॉनबाधिताची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. त्यामुळे त्या रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांची प्रकृती ठणठणीत असली तरी नियमानुसार त्यांना पुढील सात दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे.

मुंबई, पुण्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळला. या नंतर ५ डिसेंबर रोजी नागपुरातही या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला. त्‍यामुळे खळबळ उडाली होती. पश्चिम आफ्रिकेतील बुर्किनो फासो येथून दिल्ली व तेथून विमानाने हे रूग्ण नागपुरात आले होते. नागपूर विमानतळावर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले होते. मात्र, अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.

सुरुवातीपासूनच त्यांना कोणही लक्षणे नव्हती. ५ डिसेंबर रोजी नागपुरात विमानतळावर ज्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या, त्यात तिघे जण पॉझिटिव्ह आढळले होते. दरम्यान, या तिघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले होते. यात यांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला. यांची १४ डिसेंबर रोजी म्हणजे मंगळवारी आटरीटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात ते निगेटिव्ह आढळले. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचीही यापूर्वीच आरटीपीसाआर चाचणी झाली.

BB 15 : अभिजीत बिचुकलेने देवोलीनाकडे ‘KISS’ मागितल्याने मोठा राडा

त्यात ते सर्वच निगेटिव्ह आले होते. बुधवारी पुन्हा एकदा त्यांची चाचणी झाली. त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्यांच्यासह प्रवासात असलेले आणखी दोनजण करोना पॉझिटिव्ह होते. त्यांच्यावरही एम्समध्येच उपचार सुरू होते. मात्र, त्यांचाही अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांनाही आता सुटी देण्यात आली आहे.

Back to top button