चंद्रपुरात केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

चंद्रपुरात केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने चिखल फेको आंदोलन करण्यात आले.
चंद्रपुरात केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने चिखल फेको आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या अनेक अन्यायकारक  निर्णयाविरोधात आज (दि.२१) चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखल फेक आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुभाष धोटे व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत.  मात्र, सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे.  नीट सारखे परीक्षा घोटाळे होत आहे. शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसून शिंदे सरकार सगळ्या आघाड्यांवर सपशेल फेल ठरले आहे, असा आरोप यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी केला.  यावेळी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक तयार करण्यात आलेल्या पुतळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी यांनी चिखल माखून केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news