पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया; चंद्रपूरात दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके

चंद्रपूर जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके
चंद्रपूर जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या कोणत्याही बालकाला पाठ्यपुस्तकांसाठी शिक्षणात अडचण येणार नाही. शाळेत सर्व दाखल पात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे तसेच गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा व अंशत: अनुदानित शाळेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 1 लाख 60 हजार 963 विद्यार्थ्यांकरीता 6 लाख 30 हजार 849 पाठ्यपुस्तकाची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. त्यानुसार सर्व पाठ्यपुस्तके तालुकास्तरामार्फत शाळेपर्यंत पोहोच करण्यात आली आहेत. सदर पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, अधिकारी, पालक, प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना वितरीत करून पुस्तक दिन साजरा करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news