महाराष्ट्रात जुलैमध्ये भाजपची धन्यवाद यात्रा: चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा:  लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजप धन्यवाद यात्रा काढणार आहे. सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी यात सहभागी होतील. ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांच्यापर्यंत मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत, असे माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यशाने हुरळून गेले आहेत.

शरद पवार म्हणाले की, मोदींनी माझ्यावर प्रत्येक सभेत टीका केली, हे माझे भाग्य आहे, शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले, शेतकर् यांच्या मदतीने आम्ही सत्ताबदल करू, असे विधान केले. या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी एखाद्या शब्दाने टीका केली असेल. पण तुम्ही मागील दीड वर्षापासून मोदी यांना काय काय बोलत आहात. महाराष्ट्राच्या जनतेनेही त्याची नोंद घेतली आहे. आज यशाने ते थोडे हुरळून गेले आहेत. अत्यंत तुच्छ आणि गलिच्छ पद्धतीने मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. शरद पवार यांनी या गोष्टीचे आकलन केले पाहिजे.

विधानसभेत अजित पवार महायुतीसोबत असणार आहेत का?

या प्रश्नी महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र काम करत महायुतीच्या माध्यमातून पुढे जायचे ठरविले आहे. अजित पवार यांना टार्गेट केले जात असल्याने नाराजीबाबत, आमच्याकडून असे कोणीही बोललेले नाही, आमच्याकडून असा कोणी प्रयत्न देखील करत नाही. छगन भुजबळ यांना विचारावे लागेल की त्यांची नाराजी काय आहे. भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल मी माझे मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही. याबाबतची काळजी सरकारने घेतली पाहिजे, अशी भूमिका आमची पहिल्यापासून आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना महाराष्ट्रात कोणती जबाबदारी मिळू शकते? असे छेडले असता एकनाथ खडसे अजून भाजपामध्ये नाही, जेव्हा भाजपत येतील, तेव्हा बघू असे सांगितले.

विधानसभा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव आल्यानंतर महायुतीत सविस्तर चर्चा करतील. नाना पटोले इतक्या खालच्या स्तराला गेले आहेत की, शेतकऱ्याला पाय धुवायला लावत आहेत. महाराष्ट्राला अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला आहे. इंग्रजांच्या काळात ज्या पद्धतीने देश गुलामगिरीत होता, काँग्रेसने पुन्हा इंग्रजांचा काळ आणला आहे. पटोले यांनी त्यांच्या पदाचा आणि व्यक्ती म्हणून स्वतःचा देखील अपमान केला आहे, असा निषेध केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news