भाजपने ओबीसी नेत्यांना संपविण्याचा काम केले : पटोलेंचा घणानात

file photo
file photo

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : भाजपला नेहमीच ओबीसी बद्दलचा राग राहिलेला आहे. अनेक ओबीसींच्या नेत्याला भाजपने संपविले आहे. छगन भुजबळ यांना जेलमध्ये टाकले आणि परत त्यांना सोबत घेत मंत्रीमंडळात स्थान देऊनही त्यांचा छळ बंद केला नाही. एकंदरीत भाजप ओबीसी नेत्यांना संपविण्याचा काम केला आहे. असा घणानात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

गोंदिया येथे (दि.14) एका कार्यक्रमात नाना पटोले आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांच्या समन्वय समितीच्या अनुपस्थितीवरून माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेला आहे. राज्याच्या असंविधानिक सरकारबद्दल आम्ही जास्त वक्तव्य करावं अस मला वाटतं नाही. या सरकारनं शेतकऱ्यांकडे बेरोजगारांकडे जे दुर्लक्ष केलं आहे. त्याच्यावर आम्हाला लक्ष घालायचे असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेतून या निवडणुकीत आपल्याला काँग्रेसची मतं मिळाली असा खळळजनक दावा केला होता. यावर भाजपची मतं आम्हाला मिळाली असं म्हणायचं का? असा सवाल करत सुनील तटकरे यांना प्रतिउत्तर दिले. तर भाजप आणि हे भाजप प्रणित सरकार हे महाराष्ट्र विरोधी असल्याची टीकाही पटोले यांनी केली. दरम्यान, अजित पवार यांच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतले या विषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला पण आंदोलन केले नाही, काँग्रेसच्या काळात अण्णा हजारे जसे आंदोलन करत होते, तसे आंदोलन करायला हवे, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news