नवेगाव बांध जलाशयात मान्सूनपूर्व तयारीची रंगीत तालीम

नवेगाव बांध जलाशयात मान्सूनपूर्व तयारीची रंगीत तालीम

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : नवेगावबांध जलाशयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदियातर्फे पूर परिस्थितीत शोध आणि बचावकार्याची रंगीत तालीम शुक्रवारी (दि.14) पार पडली. बचाव पथकाद्वारे पूर परिस्थितीत सुरक्षा आणि बचाव तसेच पूर परिस्थितीत उपयोगी पडणारे शोध बचाव साहित्यांची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली.

पूर परिस्थितीमध्ये जीवित तसेच वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदियातर्फे सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. मान्सूनपूर्व तयारी 2024 च्या अनुषंगाने गावपातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच हवामान खाते आणि पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हाट्सॲपच्या माध्यमातून माहिती देण्याकरिता तालुका, गाव पातळीवर व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात येत आहे. सदर रंगीत तालीम आणि प्रशिक्षण कार्यक्रमात अनिरुद्ध कांबळे तहसीलदार अर्जुनी मोरगाव, उपकार्यकारी अभियंता विजय हटवार, उपअभियंता राहुल टेंभुर्णे, जितेंद्र सोरले, संजय शहारे, लुकेश पटले तसेच कर्मचारी आणि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीचे संदेश आता एसएमएस द्वारे

जिल्ह्यातील पूरप्रवण 96 गावामधील नागरिकांसह जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती विषयक सूचना, संदेश, इशारा आणि माहिती प्राप्त करून घेण्यासाठी मोबाईलमधून खालील मोबाईल नंबर व लँडलाईन क्रमांकावर डायल करून आपले मोबाईल क्रमांक पंजीकृत करावे. 9404991599 किंवा 07182- 230196 वरील क्रमांकावर पंजीकृत मोबाईल धारकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया यांचेमार्फत विविध प्रकारच्या आपत्ती विषयक सूचना, संदेश, इशारा व माहिती चे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी आपले मोबाईल पंजीकृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news