मी नागपूरचा, जनता माझी, यापुढे अधिक विक्रम करणार : मंत्री गडकरी

मी नागपूरचा, जनता माझी, यापुढे अधिक विक्रम करणार : मंत्री गडकरी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील जनतेने मला तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत निवडून दिले. मी नागपूरचा असून नागपूरची जनता माझी आहे. आजवर माझ्या खात्यामार्फत 7 विश्वविक्रम करण्यात आले, यापुढील काळात अधिक जोमाने काम करणार, नवे विक्रम प्रस्थापित करणार अशी ग्वाही केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरातील पत्रकारांशी बोलताना दिली.

तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर गडकरी यांचे आज (दि.13) रात्री नागपुरात आगमन झाले. यानिमित्ताने ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलत होते. धामणा येथील स्फोटाच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू ही घटना अतिशय दुर्दैवी असल्यामुळे मलाच नव्हे तर संपूर्ण नागपूरकरांना तीव्र दुःख झाले.

मृतांच्या नातेवाईकांविषयी मी तीव्र संवेदना व्यक्त करतो. यामुळेच आपण रॅलीसह स्वागताचे सर्व कार्यक्रम रद्द करावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. असेही यावेळी गडकरी यांनी नमूद केले. दरम्यान, नागपुरातील जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अधिक जोमाने प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. कुठल्याही राजकीय नेत्यासाठी जनतेचे प्रेम विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट असते मी याबाबतीत खूप नशीबवान आहे. मी कधीही जात-पात, धर्म, पंथ,लिंग असा भेदाभेद काम करताना केलेला नाही.

यामुळेच मला लोकांचे अधिक प्रेम मिळाले. अर्थातच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा, अधिक जोमाने काम करण्याचा मी यापुढील काळात प्रयत्न करील.दरम्यान, आपले खाते कायम ठेवण्यात आले की मागितले या संदर्भात छेडले असता गडकरी यांनी यावर आज चर्चा नको नंतर बोलू असे म्हणत अधिक बोलणे टाळले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news