विदर्भ होरपळला; ब्रम्हपुरीचे तापमान ४६ अंशावर

विदर्भ होरपळला; ब्रम्हपुरीचे तापमान ४६ अंशावर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भात कडक उन्हामुळे नागरिक होरपळून निघत आहेत. उष्णतेचा पारा वाढल्याने गुरूवारी (दि.३१) चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा ऑरेंज तर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पुढचे दोन दिवस यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भातील तापमान ४० अशांवर गेले होते. आज गुरुवारपर्यंत त्यामध्ये वाढ होऊन ४५ अंश सेल्सिअसच्या वर या तापमानाचा पारा गेला आहे.

हवामान खात्याने नागरिकांना अलर्ट करत गुरुवारी चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे ऑरेंज अलर्ट चा इशारा दिला. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील उद्याचा शेवटचा दिवस आहे. हा आठवडा पूर्व विदर्भात चांगला तापला आहे. तापमान ४० अंशापासून ४५ अंशावर तापमानाची या आठवड्यात विदर्भात नोंद घेण्यात आली. त्यामुळे नागरिकांना कडक उष्णतेचा सामना करावा लागत आहे. चंदपुरातील ब्रम्हपुरी, नागपूर, वर्धा, या ठिकाणी उष्णतेच्या लहरी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी या वाढत्या तापमानापासून स्वत : चा बचाव करण्यासाठी शक्यतो बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

हवामान खात्याने नोंदविलेले तापमान 

हवामान खात्याने आज गुरूवारी अकोला ४२.९, अमरावती ४४.२, भंडारा ४५.३, बुलढाणा ३९.०, ब्रम्हपुरी ४६.९, चंद्रपूर ४५.६, गडचिरोली ४५.०, गोंदिया ४४.८, नागपूर ४४.६, वर्धा ४५.० वाशीम ४२.८, यवतमाळ ४३.५, अशी तापमानाची नोंद घेतली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news