नागपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन जीवन संपविले | पुढारी

नागपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन जीवन संपविले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर (व्हीएनआयटी) मधील अभियांत्रिकी (सीएसई)संगणक विज्ञान, अंतिम वर्षाचा विद्यार्थी दिव्यांशु गौतम याने मुलांच्या वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपविले. दिव्यांशु पुनिया बिहार येथील रहिवासी असून या घटनेनंतर कुटुंबीय नागपूरकडे निघाले आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. व्हिएनआयटी प्रशासनाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांनी गौतमच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. गेल्या काही दिवसांपासून गौतम दिसला नव्हता. काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दरवाजाचे लॅच तोडून प्रवेश केला असता गौतम जमिनीवर पडलेला दिसला.

काही दिवसांपूर्वीच गौतमने गळफास घेतल्याचा आणि वजनामुळे कपडे फाटल्याने तो जमिनीवर पडला असावा असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Back to top button