Nagpur News: ऑटोचालकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन, मुलींच्या सुरक्षितेबद्दल पालकांची वाढली चिंता | पुढारी

Nagpur News: ऑटोचालकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन, मुलींच्या सुरक्षितेबद्दल पालकांची वाढली चिंता

नागपूर, पुढारी वृत्तसेवा:  एका ऑटोचालकाने त्याच्या ऑटोमध्ये एकट्याच असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. नागपुरातील ग्रीन प्लॅनेट कॉलनी, ओंकार नगरजवळ बुधवारी (दि.८) दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेने  नागपुरात खळबळ माजली. पोलिसांकडून ‘या’ ऑटोचालकाचा तातडीने शोध घेत त्याच्यावर पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरातील सीसीटीव्हीत हा गैरप्रकार कैद झाला असून, एका जागरूक नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याची माहिती आहे. शेवटी आरोपी ऑटो चालकाचा शोध घेण्यात पोलिसांना मदत झाली. घटनेची पुष्टी करताना डीसीपी क्राईम नितीन गोयल यांनी सांगितले की, आरोपी ड्रायव्हरचा शोध लागला असून, लवकरच त्याला ताब्यात घेत पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, ही मुलगी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असून, तिच्या पालकांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्यास नकार दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे वासनांध, नराधमांना जरब कसा बसणार? हा प्रश्न कायम आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा पालकांची चिंता वाढली असून, विद्यार्थ्यांच्या ऑटोतून शाळा,महाविद्यालयात जाण्यावर तसेच मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

Back to top button