Lok Sabha Election 2024 : ‘विदर्भात चमत्कार घडणार’: अनिल देशमुखांच्या घराबाहेरील बॅनर चर्चेत  | पुढारी

Lok Sabha Election 2024 : 'विदर्भात चमत्कार घडणार': अनिल देशमुखांच्या घराबाहेरील बॅनर चर्चेत 

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  दोन दिवसांपूर्वी मतदानापासून वंचित राहिलेल्या 10 लाख मतदारांच्या बॅनर पाठोपाठ आता नागपुरातील एका बॅनरने नागपुरातील सर्वांचे लक्ष वेधले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर ‘विदर्भात चमत्कार घडणार’ असे देशमुख यांच्या घराबाहेर बॅनर लागले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराबाहेर लागलेल्या बॅनरचा अर्थ काढण्याचे वेगवेगळे तर्क पाहायला मिळत आहे. Lok Sabha Election 2024

या बॅनरवर अनिल देशमुख आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचे फोटो लागलेले आहेत. विशेष म्हणजे आता विदर्भातील 19 आणि 26 एप्रिल असे दोन्ही टप्प्यातील 10 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे मतदान आटोपले आहे. गेल्यावेळी विदर्भच नव्हे, तर राज्यभरात केवळ चंद्रपूरची जागा काँग्रेसला जिंकता आली होती. यावेळी म्हाविकास आघाडीला विदर्भात पोषक वातावरण असून नक्कीच मविआला मोठे यश मिळेल, महायुतीला फटका बसेल, असा अंदाज वर्तविला जात असून त्यादृष्टीने हे बॅनर विदर्भातील लढतीचे चित्र स्पष्ट करणारे असल्याचे बोलले जाते. Lok Sabha Election 2024

हेही वाचा 

Back to top button