रत्नागिरी-सिंधुदुर्गचा दोन दिवसात अमित शहा घेणार निर्णय, इच्छुकांना सबुरीचा सल्ला | पुढारी

रत्नागिरी-सिंधुदुर्गचा दोन दिवसात अमित शहा घेणार निर्णय, इच्छुकांना सबुरीचा सल्ला

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूर-सिंधुदुर्ग-रत्नागिरी या लोकसभेच्या जागेसंदर्भात दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निर्णय घेणार आहेत. तोवर इच्छुक असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना दोन दिवस शांत रहावे असा सबुरीचा सल्ला दिला आहे. रविवारी रात्री किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली होती.

या जागेवर गृहमंत्री अमित शहा दोन दिवसात अंतिम निर्णय घेणार आहेत, त्यामुळे किरण सामंत यांना पुढची दोन दिवस शांत राहून निर्णयाची वाट पाहण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत. दरम्यान, दुसरे इच्छुक नारायण राणे यांना पण शांत राहण्याच्या तशाच सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपण 3 लाख मतांनी जिंकू, 5 वर्षे काम केले, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर यावर तोडगा निघेल यावर विश्वास आहे. त्यांचा जो काही आदेश असेल तो मान्य असेल अशी कबुली किरण सामंत यांनी दिली होती. दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत भाजप की सेना लढणार हा तिढा कायम आहे. दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांना उद्योगमंत्री उदय सामंत भेटून गेले. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे धनुष्यबाणावरच निवडणूक लढवली गेली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

हेही वाचा ; 

Back to top button