सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने तापले वातावरण, काँग्रेस आक्रमक | पुढारी

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने तापले वातावरण, काँग्रेस आक्रमक

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा झाली. यावेळी आवेशपूर्ण भाषणात बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. 1984 मधील घटनाक्रम सांगताना मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींच्या पवित्र नात्यावर आक्षेपार्ह असे असभ्य भाष्य केल्याचा आरोप करीत काँग्रेस आज रस्त्यावर उतरली.

याविरोधात भाजपने अर्धवट व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप केला आहे. तर  मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचे प्रतिसाद राज्यभर उमटत आहेत. आज चंद्रपूर शहरातील गांधी चौकात महिला काँग्रेसने मुनगंटीवारांचा निषेध केला. यापुढे बोलताना मुनगंटीवार यांनी खबरदारी घ्यावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नम्रता ठेमस्कर, अध्यक्ष जिल्हा महिला काँग्रेस, अश्विनी खोब्रागडे यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.

हेही वाचा 

Back to top button