नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेणारा अभिनेता गोविंदा आज प्रचार दौऱ्यातून वेळ काढत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थानी पोहोचला. काही काळ चर्चा झाल्यानंतर दोघेही आपापल्या पुढील प्रवासाला रवाना झाले. यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भातील रामटेक,यवतमाळ आणि बुलढाणा या तीन मतदारसंघात गोविंदाच्या सभा, प्रचार दौरे सुरू आहेत. Govinda meet Nitin Gadkari
अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईतून निवडणूक लढणार अशी चर्चा असतानाच आपण निवडणूक लढणार नाही तर शिवसेनेचा प्रचार करणार अशी भूमिका गोविंदाने जाहीर केली व तो शिंदे सेनेसाठो स्टार प्रचारक म्हणून कामाला लागला पहिल्या टप्प्यात 4 ते 6 एप्रिल दरम्यान गोविंदाने नागपूर ,रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात शिवसेना व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला व तो मुंबईत परतला. यानंतर 11 व 12 एप्रिल रोजी यवतमाळ- वाशिम मतदार संघात आणि 15 आणि 16 रोजी हिंगोली मतदारसंघात प्रचाराला जाणार आहे. दरम्यान, 17 आणि 18 एप्रिल रोजी गोविंदा शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी पुन्हा विदर्भातील बुलढाणा मतदारसंघात येणार आहे.
हेही वाचा