नागपूर: मतदार जागृतीसाठी कस्तुरचंद पार्कवर विक्रमी ८१०० मतदारांचा सहभाग

नागपूर: मतदार जागृतीसाठी कस्तुरचंद पार्कवर विक्रमी ८१०० मतदारांचा सहभाग
Published on
Updated on

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : सूर्योदयाच्या साक्षीने ८१०० नागपूरकर मतदारांनी आज (दि.६)  मिशन डिस्टिंक्शन यशस्वी करण्याचा संकल्प केला. स्वीप अंतर्गत मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करुन लोकशाहीच्या महत्वपूर्ण उत्सवात आपले कृतीशील योगदान द्यावे. यादृष्टीने नागपूर येथे प्रशासनाच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात आहे. मतदार साक्षरतेसाठी आज कस्तुरचंद पार्क येथे झालेल्या मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाईट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अॅकॅडमीने मानांकन बहाल करुन नागपुरकरांचा गौरव केला. 7000 चे लक्ष्य असताना 8100 मतदारांचा सहभाग यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचा उत्साह वाढविणारा ठरला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.

कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांच्या विशेष उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभास विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, अतिरिक्त आयुक्त डॉ. माधवी खोडे चावरे, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पद्मश्री सन्मानित डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. यात प्रत्येक ब्लॉकनुसार मतदार विभागून बसले. एनसीसीच्या युवा मतदारांनी ड्रेस कोडमध्ये येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इलाईट वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अँबेसेडर अमित हिंगोरानी, इंडिया रिकॉर्ड अकॅडमीचे वरिष्ठ मॅनेजर पी. जगन्नाथन यांनी नागपुरच्या या वैशिष्ट्यपूर्ण मतदार जागराच्या पाठाला रेकॉर्डब्रेक उपस्थितीसह मानांकन प्राप्त झाल्याचे जाहीर केले.

या पाठाअंतर्गत मतदारांची जबाबदारी व लोकशाहीच्या सशक्तीकरणाबद्दल सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधून जबाबदार नागरिकत्वाची भूमिका समजावून सांगितली. गटविकास अधिकारी, राजनंदिनी भागवत यांनी मतदारांना आपल्या परिसरातील मतदान बुथ, वोटर हेल्पलाईन ॲपची सविस्तर माहिती दिली. तहसिलदार रोशन मकवाने यांनी मतदान यंत्राबाबत संपूर्ण माहिती दिली. उपजिल्हाधिकारी सुरेश बगळे यांनी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी असलेल्या सेवासुविधा, निवडणूक विभागाची भूमिका याबाबत माहिती करुन दिली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे यांनी युवा मतदानबाबत जागृती अभियानाची संकल्पना मांडली. निवडणूक आयोगामार्फत यापुर्वी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ने सन्मानित केले आहे. मिशन युवा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मतदार नोंदणी अभियानात 75 हजार युवकांनी आपली नाव नोंदणी मतदार यादीत नोंदवून नागपुरला वेगळे वैभव प्राप्त करुन दिले. यावेळी मतदारांच्या साक्षरतेसाठी व मतदानाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने निर्मिती करण्यात आलेली 'अधिकार है' ही ध्वनीचित्रफित रिलीज करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी मतदारांना शपथ दिली.

समाजातील विविध घटक सहभागी

या कार्यक्रमात लोकसहभागाचे प्रतिनिधीत्व म्हणून एशियन खेळाडू ओजस प्रविण देवतळे, क्रिकेटपटू वृदराज राऊत, पारलिंगी कार्यकर्ती विद्या कांबळे, जगातील सर्वात कमी उंचीची ज्योती आमगे, ज्येष्ठ नागरिक सुरेश रेवतकर, आंतरराष्ट्रीय स्वीमींग खेळाडू जयंत दुबळे, माजी सैनिक संजय खंडारे, सफाई कर्मचारी रोशन बन्सोड, संदीप राऊत, पोलीस विभागातील सुशिल धाकटे, आदी क्षेत्रातील प्रतिनिधी यांना निमंत्रित केले होते. मनीष सोनी यांनी सूत्रसंचालन केले. जि.प. सीईओ सौम्या शर्मा यांनी आभार मानले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news