नागपूर ; पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या खासदारांची गती काय आहे, ना घर का, न घाट का अशी अस्वस्था त्यांची झाली आहे. यामुळेच भविष्याचा वेध घेता शिंदे गटातील निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात आहेत असा दावा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
विदर्भात महाविकास आघाडीला अनुकूल परिस्थिती आहे. काँग्रेसच्या बाजूने कल आहे. मोदी-फडणवीस सरकार विरोधात राग आहे. हुकूमशाही पद्धतीने काम सुरू आहे. लोकांमध्ये भीती आहे. चंद्रपूरला प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारात मी सक्रिय आहे. शेवटी मी पक्षाचाच कार्यकर्ता आहे. मी तसाही जाणार होतो. त्यांनी माझी भेट घेतली ही वस्तुस्थिती असली तरी प्रचार सभेत 9 आणि 10 ला मी जाणार आहे आणि प्रचार करणार आहे. यासोबतच भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांसाठी पूर्ण ताकदीनिशी काम करत आहे. राहुल, प्रियंका गांधी यांच्या सभेची जोरात तयारी सुरू आहे.
सांगली मतदारसंघात वाद विवादाचा विषय राहणार नाही, ती जागा मुळात काँग्रेसची होती. शेवटी या सगळ्या वादात ताणून घ्यायचे नाही हे आमचे धोरण असून, हायकमांड निर्णय घेईल असेही एका प्रश्नाचे उत्तरात वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. भिवंडीसारखी परंपरागत जागा जेव्हा जाते तेव्हा नाराजी असते, ती दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :