Nagpur Crime News :’लिव्ह इन’मधून महिलेचा खून, झाडावर मृतदेह लटकावून रचला बनाव

file photo
file photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हल्ली लिव्ह इनमध्ये राहण्याचे प्रमाण वाढत असतानाच काही दिवसांनी त्यांच्यात उडणारे खटकेही चर्चेत आहेत. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. सुरुवातीला आत्महत्येचा हा प्रकार असल्याचे दिसत असताना हा ' लिव्ह इन' मधून हत्येचा प्रकार असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी विवाहित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.  गंगाधर अर्जुन घरडे (वय ४८, रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर नीतू (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. Nagpur Crime News

चारित्र्याच्या संशयातून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून मृतदेह सीताफळाच्या झाडाला लटकवला होता.  विवाहित प्रियकराने सदर तरुणीची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही घटना आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. मात्र, शवविच्छेदन अहवालात ही हत्या असल्याचे समोर आले आणि पोलिसांनी फास आवळला. Nagpur Crime News

जरीपटका परिसरात २ मार्चरोजी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. मात्र, पोस्टमार्टममध्ये प्रियकराचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी गंगाधरला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. गंगाधर हा पेंटिंगचे काम करतो. नीतूचे आधी लग्न झाले असून तिला पहिल्या पतीपासून दोन मुली होत्या. २०१७ पासून ती पतीपासून वेगळी व घरकाम करून उदरनिर्वाह चालवत होती.  २०१९ मध्ये तिने गंगाधरशी लग्न करत असल्याचे कुटुंबीयांना सांगत ती लिव्ह इनमध्ये त्यांच्यासोबत राहू लागली.

मात्र, काही दिवसानंतर नीतूने कुटुंबीयांना सांगितले की, गंगाधर आधीपासूनच विवाहित असून त्याला दोन मुलीही आहेत. तो दररोज दारूच्या नशेत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याची माहिती दिल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. १ मार्चच्या रात्री गंगाधरने त्याची प्रेयसी नीतूचा गळा आवळून हत्या केली. रात्रीच्या अंधारातच तिचा मृतदेह घरासमोरील सीताफळाच्या झाडाला लटकवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांत नीतूने आत्महत्या केल्याची माहिती दिली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news