सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या साहाय्याने हा अपघात नसून, हत्येचा गुन्हा असल्याची उकल पोलिसांनी केली. पोलीस सूत्रानुसार जिवा कारंडे (वय, ३४) याची पत्नी व लक्ष्मण यादुबा कोळपे (३५, रा. राजुरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, खान्देश) याचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याने कारंडे हा अडसर ठरत होता. त्यामुळे लक्ष्मण कोळपे व त्याचा कामगार संतोष अर्जुन कोरडकर (२४, रा. कुन्हा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, खान्देश) यांनी संगनमत करून जिवा कारंडे याचा गळा आवळून त्याच्या दाढीवर, गालावर, नाकावर कोणत्या तरी वस्तूच्या साहाय्याने आघात व मारहाण करून त्यास ठार मारले. व रस्त्याच्या कडेला सोडून दिले असावे किंवा टाकून पळून गेले असावे, असे तपासात निष्पन्न झाले. Akola News