अकोला : तापमानाने गाठला  40 डिग्री सेल्सिअस चा आकडा  

file photo
file photo
अकोला: पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी अकोला जिल्ह्याचे तापमान उन्हाळ्यात वाढते असते. सध्या मार्च एंडिंगमध्ये तापमान वाढत असल्याचे जाणवत आहे. अकोल्याचे कमाल तापमान रविवारी (दि. २४) सायंकाळी ५. ३० वाजता  ४०.५ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर रविवार व  सोमवारी देखील सूर्यनारायणाचा हा क्रम नित्यासारखाच होता.
तप्त उन्हामुळे अकोला शहरात दुपारी रस्त्यावर नागरिकांची गर्दी कमी दिसून येत आहे. घराबाहेर निघताना नागरिक रुमाल, दुप्पटा, परिधान करुन उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.  अकोल्याचे कमाल तापमान वाढत असून रविवारी ४०.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने केली आहे.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news